ओटवणे /प्रतिनिधी-
माजगाव कासारवाडा येथील कालिका प्रसाद महिला मंडळाच्यावतीने चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. सावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप कांबळी यांच्याकडे या जीवनावश्यक वस्तूं आणि कपडे व इतर साहित्य सुपूर्द करण्यात आले.
कासारवाडा येथील कालिका प्रसाद महिला मंडळाकडून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. यावेळी चिपळूण येथील पूरस्थितीची भयानकता पाहून तेथील पूरग्रस्ताना या महिला मंडळाने आपला मदतीचा हात दिला आहे. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा मीरा कासार, मंडळाच्या सदस्य आणि शिवसेना विभाग संघटक भारती कासार, अर्चना कासार, अश्विनी कासार, मीरा कासार, सुनयना कासार, विलासिनी कासार, प्राजक्ता कासार, दीप्ती कासार, सुवर्णा कासार आदी महिला उपस्थित होत्या.