कोयनेच्या अवजलापासून 11 ठिकाणी वीजनिर्मिती
प्रतिनिधी / रत्नागिरी
दुसऱ्या सिंचन आयोगाने कोयनेचे अवजल चिपळूणमध्ये येते परीसरातील संपूर्ण पाणलोट क्षेत्रामधील 11 ठिकाणी पुन्हा वीज निर्मिती होवू शकले असा निश्कर्ष काढला आहे. अशा ठिकाणी वीजनिर्मितीसाठी प्रयत्न झाल्यास वीजनिर्मितीक्षमता वाढण्याबरोबरच प्रामुख्याने चिपळूणमधील पूरस्थितीवर मात शक्य असल्याचे मत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी व्यक्त केले आहे.