दिल्लीतील अलायन्स एअरलाईन्सची टीम दाखल : महत्वाच्या बाबींची केली पाहणी
भूषण देसाई / परुळे:
चिपी-परुळे येथील विमानतळाला अंतिम परवानगी मिळण्याच्या हालचालींना वेग आला आहे. दिल्ली येथील अलायन्स एअरलाईन्सची टीम गुरुवारी येथे दाखल झाली. विमानतळाच्या महत्वाच्या बाबींची पाहणी करून ही टीम पुन्हा दिल्ली येथे रवाना झाली.
नियोजित वेळापत्रकापूर्वी दोन दिवस अगोदर अलायन्स एअरलाईन्स ही केंद्राची टीम विमानतळावर दाखल झाली. या टीमने रनवे, टॅक्सीवे, अ?Ÿप्रॉन आणि आयसोलेशन बे व महत्वाच्या इमारतींची पाहणी केली. 2005 पासून चिपी विमानतळ केव्हा सुरू होणार, याबाबत अनेक तारखा जाहीर होत होत्या. मात्र, आता खऱया अर्थाने या विमानतळाला अधिकृत परवानगी मिळण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
अधिकृत परवानगीनंतर हवाई मार्गाच्या यादीत समावेश
अधिकृत परवानगी मिळाल्यानंतर हवाई मार्गाच्या यादीत या चिपी विमानतळाचा समावेश होणार आहे. त्यानंतर अवघ्या दोन ते तीन दिवसांत हवाई प्रवासाचे स्वप्न साकार करण्यासाठी खऱया अर्थाने विमानाचे बूकिंग सुरू होईल.
विमानतळ कार्यान्वित करण्यासाठी आयआरबीचा चंग
हा विमानतळ प्रकल्प आजवर एक खासगी प्रकल्प म्हणून कार्यरत होता. मात्र, या परवानगीनंतर तो अधिकृत हवाई मार्गांमध्ये जोडला जाणार आहे. जानेवारी 2021 मध्ये हा विमानतळ कार्यान्वित करण्यासाठी आयआरबी कंपनीने चंग बांधला असून जाहीर झालेल्या तारखेअगोदर दोन दिवस हा विमानतळ कार्यान्वित होण्याची शक्मयता निर्माण झाली आहे.
विमानतळाचे उद्घाटन 26 पूर्वीच?
याबाबत गुप्तता पाळण्यात येत आहे. मात्र, 26 जानेवारी रोजी शासकीय सुट्टी असल्याने विमानतळाचे उद्घाटन अगोदरच करून घेऊन पुढे दोन दिवसांत नियमित मुंबई-चिपी, चिपी-मुंबई विमानसेवा सुरू करण्याची जय्यत तयारी सुरू आहे. गुरुवारी पाहणीसाठी आलेल्या पथकामध्ये अलायन्स एअरलाईन्सचे वरिष्ठ अधिकारी तसेच आयआरबीचे कुलदीप सिंग, एकनाथ सपकाळ उपस्थित होते. mCompleteDuration