हैदराबाद : तेलंगणात 6 वर्षीय मुलीवर बलात्कार आणि हत्या केल्याचा आरोप असलेल्या इसमाचा मृतदेह रेल्वेमार्गावर सापडला आहे. पोलिसांनी शरीरावरील टॅटूद्वारे त्याची ओळख पटविली आहे. मृतदेह हैदराबादच्या सिंगारेनी कॉलनीत झालेला बलात्कार तसेच हत्येचा आरोपी पी. राजू (30 वर्षे) याचा असल्याची पुष्टी तेलंगणा पोलीस महासंचालकांनी दिली आहे.
2 दिवसांपूर्वीच राज्याचे मंत्री मल्ला रेड्डी यांनी आरोपीला चकमकीत ठार करू असे म्हटले होते. मुलीवर बलात्कार आणि तिची हत्या 9 सप्टेंबर रोजी झाली होती. तिचा मृतदेह एका बंद घरात सापडला होता. याप्रकरणी शेजारी राहणारा व्यक्ती पी. राजू आरोपी होता. तेलंगणा पोलिसांनी आरोपीला अटक करण्यासाठी 15 पथकांची स्थापना केली होती.