प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरालगतच्या शिरगांव क्रांतीनगर येथे चिरेखाणीत पोहण्यासाठी गेलेल्या 15 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल़ा ही घटना रविवारी सायंकाळी 6 च्या सुमारास घडल़ी उस्मान मोहबत्त अली रिफाई (15, ऱा क्रांतीनगर झोपडपट्टी) असे मृत झालेल्या मुलाचे नाव आह़े
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उस्मान हा रविवारी सायंकाळी क्रांतीनगर येथील चिरेखाणीत पोहण्यासाठी गेला होत़ा यावेळी उस्मान हा पोहताना चिरेखाणीत बुडाल़ा या घटनेची खबर परिसरातील नागरिकांना समजताच उस्मान याला पाण्यातून बाहेर काढण्यात आल़े उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱयांनी उस्मान याला तपासून मृत घोषीत केल़े या घटनेची खबर जाफर रिफाई यांनी शहर पोलीस ठाण्यात दिल़ी याप्रकरणी पुढील तपास करण्यात येत आह़े