गेब्रियल बोरिश यांचा अध्यक्षीय निवडणुकीत एकतर्फी विजय
वृत्तसंस्था/ सँटियागो
चिलीमध्ये डाव्या पक्षांचे नेते गेब्रियल बोरिश यांनी अध्यक्षीय निवडणुकीत 56 टक्के मते मिळविली आहेत आणि उजव्या विचारसरणीचे नेते जोस एंतोनियो यांच्यावर मात करत ऐतिहासिक विजय मिळविला आहे. विषमता आणि गरीबी दूर करण्यासाठी युवा नेतृत्वाखालील सर्वसमावेशक सरकारच्या स्थापनेसाठी गेब्रियल यांनी कित्येक महिन्यांपर्यंत मेहनत केली आहे. विषमता आणि गरीबी दशकांपूर्वी जनरल ऑगस्तो पिनोशे यांच्या हुकुमशाहीकडून थोपविण्यात आलेल्या मुक्त बाजारपेठ मॉडेलचा अस्वीकारार्ह कमकुवत हिस्सा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
2012 मध्ये मतदान अनिवार्य झाल्यापासून कुठल्याही नेत्याला मिळालेली ही सर्वाधिक मते ठरली आहेत. 35 वर्षांच्या वयात चिलीच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळविणारे ते सर्वात कमी वयाचे नेते आहेत. समर्थकांच्या मोठय़ा गर्दीदरम्यान गेब्रियल यांनी ‘स्वदेशी’ मॅपुचे भाषेतून हजारो युवा समर्थकांना संबोधित केले आहे.
न्याय सुरू राहणार
सार्वजनिक जीवनात लहानाचे मोठे झालेली आमची पिढी असून अधिकारांचा सन्मान अधिकारांच्या स्वरुपात करण्यात यावा अशी आमची मागणी आहे. श्रीमंत आणि गरीबांसाठी न्याय सुरूच राहणार आहे. तसेच चिलीमधील गरीबांना विषमतेची किंमत मोजावी लागू नये हे देखील आम्ही सुनिश्चित करणार आहोत. महिला आमच्या सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार असून यामुळे समाजातील सर्वप्रकारच्या पितृसत्ताक विचारांना कायमस्वरुपी मागे सोडण्यास मदत मिळणार असल्याचे गेब्रिएल म्हणाले.