वार्ताहर/नावली
!! दिगंबंरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!
ओम दत्त चिलेंच्या नामगजरात आणि भक्तीमय वातावरणात सद्गुरु चिले महाराज पायी पालखी रथचे श्रीक्षेत्र जिऊर येथून प्रस्थान झाले.
चिले महाराजांचे जन्मगाव श्री जिऊर (ता पन्हाळा) येथील भैरवनाथ व चिले महाराज मंदिरात पहाटे काकड आरती,सकाळी अध्यक्ष सुभाष पाटील उपाध्यक्ष रंगराव डावरे यांनी सपत्नीक श्री कालभैरव व चिले महाराज मूर्तीस अभिषेक व विधिवत पूजा केली महाआरती नंतर उपस्थित चिले भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. दुपारी तीन वाजता आमदार सुरेश साळुंखे, के.डी सी.संचालक बाबासाहेब पाटील, श्री क्षेत्र पैजारवाडी चिले महाराज समाधी मंदिर संस्थान अध्यक्ष बाबासाहेब चव्हाण, सचिव विनायक जाधव, विश्वस्त जयसिंग पारखे, प्रकाश पाटील, किरकिरे (फलटण), राजू चव्हाण (खंडाळा), राजेंद्र पाटील, संभाजी डावरे या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पालखी रथाचे मोर्वेकडे प्रस्थान झाले यावेळी ग्रामस्थ व मंडळाच्यावतीने पालखी मार्गावर ठीक ठिकाणी स्वागर कमानी सडा-रांगोळय़ा, फुलाच्या पायघडय़ा तसेच आतिषबाजी करून पालखी रथाचे स्वागत केले.
बैलजोडय़ा, घोडे, हलगी, ढोल ताशे, बेंजो बँड असा पारंपारिक वाद्यसह हजारो चिले भक्त मोठय़ा श्रद्धेने या पालखी मिरवणूकित सहभागी होत श्री दर्शनाचा लाभ घेतला.
हा पालखी सोहळा यशस्वी पार पडण्यास भैरवनाथ मंदिर ट्रस्ट सचिव तानाजी पाटील, विश्वस्थ उत्तम निगवेकर, शिवाजी जाधव, दिलीप खांडेकर, भीमराव पाटील, शिवाजी डावरे आदींसह सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.