जवळपास 21 हजार कोटी रुपयांचा दंड ः ऍण्टी मोनोपोली कायदा तोडल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एकाधिकार विरोधात म्हणजे ऍण्टी मोनोपोली नियामावलीचे उल्लंघन केल्याच्या कारणास्तव ई-कॉमर्स कंपनी अलिबाबावर मोठय़ा प्रमाणात दंड आकारला आहे. चीनच्या या कंपनीवर मार्केट रेग्युलेटर स्टेट ऍडमिनिस्टेशन फॉर मार्केट रेग्युलेशन (एसएएमआर) यांनी 18 अरब युआन म्हणजे 20.75 हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. यासंदर्भातील माहिती ही चीनची सरकारी न्यूज एजन्सी शिन्हुआ यांनी नुकतीच दिली आहे.
एजन्सीनुसार एसएएमआरने डिसेंबर 2020 मध्ये सुरु केलेल्या पडताळणीमध्ये ई कॉमर्स कंपनीने 2015 पासून बाजारात आपली मजबूत स्थिती प्राप्त करण्यासाठी चुकीची पद्धत वापरली असल्याची माहिती आहे. चीनच्या ऍण्टी मोनोपोली कायद्याच्या विरोधात कार्य केल्याचा आरोप ठेवत कंपनीने हा दंड आकारला असल्याची माहिती आहे.
अलिबाबाचे मत
जगातील प्रमुख ई कॉमर्स कंपनी अलिबाबाने मार्केट रेग्युलेटरच्या या निर्णयाचा स्विकार केला होता. जॅक मा यांच्या कंपनीनेही म्हटले आहे, की एसएएमआरच्या निर्णयाचे आम्ही पालन करणार आहोत.
सरकारची नजर
साधारणपणे अलिबाबा समूह हा मागील वर्षातील ऑक्टोबरपासून नजरेत राहिला आहे. ज्यामध्ये कंपनीचे सहसंस्थापक जॅक मा यांनी एका कार्यक्रमात चीनच्या आर्थिक रेग्युलेटर्स आणि सरकारी बँकांवर भाष्य केले होते.
काही काळ जॅक मा होते गायब
रेग्युलेटरवर केलेल्या भाष्यानंतर जवळपास तीन महिन्यापर्यंत कोणत्याही कार्यक्रमात जॅक मा दिसून आले नाहीत. जानेवारीत एका कार्यक्रमात जॅक निदर्शनास आले होते. ते इतका काळ, कोठे, का व कशासाठी गायब झाले होते, याची माहिती मात्र म्हणावी तशी उपलब्ध नाही.