बीजिंग : ऑस्ट्रेलियाची आक्रमक भूमिका आणि बेल्ट अँड रोड इनीशिएटिव्हचे (बीआरआय) दोन करार रद्द करण्यात आल्यावर चीनचा जळफळाट सुरू झाला आहे. चीनने आता ऑस्ट्रेलियाला धमकावत व्यापारी करारांशी संबंधित सर्व कार्ये अनिश्चित काळासाठी रोखल्या आहेत. सर्व व्यापारी चर्चाही स्थगित करत असल्याचे चीनने म्हटले आहे. चीनने सध्या ऑस्ट्रेलियाकडून होणारी कोळसा, पोलाद, गहू, वाइनसमवेत अनेक सामग्रीची आयात बंद केली आहे. ऑस्ट्रेलिया शीतयुद्धाची मानसिकता आणि वैचारिक भेदभाव करत द्विपक्षीय संबंधांना नुकसान पोहोचवित असल्याचा आरोप करत चीनने हे पाऊल उचलले आहे. ऑस्ट्रेलियाने 2019 मध्येच कोरोना विषाणूच्या उत्पत्तीच्या चौकशीची मागणी केली होती. यामुळे चीन-ऑस्ट्रेलिया संबंधांमध्ये तणाव आला होता. चीनने ऑस्ट्रेलियाकडून होणाऱया अनेक सामग्रींची आयात रोखली होती.
Previous Articleचीनने गमाविले स्वतःच्या रॉकेटवरील नियंत्रण
Next Article हातांची स्वच्छताः एक सवय आरोग्यदायी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.