पूर्ण जगात कोरोना विषाणू चीनच्या वुहान शहरातूनच फैलावला आहे. परंतु चीन आता याप्रकरणी दुष्प्रचार करू लागला आहे. विषाणू चीनमधून फैलावला नसल्याचा कांगावा चिनी प्रसारमाध्यमे करू लागली आहेत. चीनमध्ये हा विषाणू फ्रोजन फूड्सद्वारे अन्य देशांमधून आल्याचे तेथील प्रसारमाध्यमे म्हणू लागली आहेत. पीपल्स डेली समवेत अनेक चिनी वृत्तपत्रांनुसार कोरोना विषाणूचा उद्रेक वुहानमध्ये झालेला नाही. वुहानमध्ये विषाणूचा शोध लागला, परंतु त्याची उत्पत्ती तेथे झाली नसल्याचे चीनचे माजी प्रमुख साथरोगतज्ञ झेंग गुआंग यांनी म्हटले आहे.
Previous Articleकर्नाटकात पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत मोठी घट
Next Article अमेरिका : 2 लाख रुग्ण
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.