वायुदलप्रमुखांचे प्रतिपादनः पूर्व लडाखमध्ये युद्ध तसेच शांततेची स्थिती नाही
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनसोबत युद्धाची स्थिती नाही आणि तेथे शांततेचे वातावरण देखील नाही असे वायुदलप्रमुख आर.के.एस भदौरिया यांनीच म्हटले आहे. आमच्या उत्तर सीमेवर सद्यस्थिती वेगळी असून तेथे ‘युद्ध अन् शांतते’ची स्थिती नाही. परंतु वायुदलाने नव्याने उदयास येणाऱया आणि बिघडणाऱया स्थितीवर वेगाने प्रतिक्रिया दिली आहे. वायुदल या क्षेत्रात कुठल्याही प्रकारच्या आगळीकीला प्रत्युत्तर देण्यास पूर्णपणे सज्ज असल्याचे भदौरिया म्हणाले.
भारतीय सुरक्षा दल कुठल्याही आव्हानाला सामोरे जाण्यास पूर्णपणे तयार असल्याचे भदौरिया यांनी एका संमेलनाला संबोधित करताना म्हटले आहे. पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनदरम्यान तणाव निर्माण झाला आहे.
राफेल, अपाचेने वाढविले बळ
यापूर्वी प्राप्त करण्यात आलेल्या सी-17 ग्लोबमास्टर, चिनूक आणि अपाचे हेलिकॉप्टर्सह अलिकडेच वायुदलात सामील राफेल लढाऊ विमानांनी वायुदलाच्या सामरिक आणि व्युहात्मक क्षमतेत पुरेशी भर पडली आहे. भविष्यात होणाऱया कुठल्याही संघर्षात वायुदलाचे सामर्थ्य आमच्या विजयाचा महत्त्वाचा घटक ठरणार आहे. याचमुळे वायुदलाने स्वतःच्या शत्रूंच्या विरोधात तंत्रज्ञानाप्रकरणी आघाडी प्राप्त करत ती कायम राखणे आवश्यक असल्याचे भदौरिया यांनी भारतीय एअरोस्पेस क्षेत्राशी संबंधित संमेलनात बोलताना म्हटले आहे.
स्वदेशी क्षमता
फ्रान्समध्ये निर्मित 5 बहुउद्देशीय राफेल लढाऊ विमानांना 10 सप्टेंबर रोजी वायुदलात समाविष्ट करण्यात आले होते. विमानांचा हा ताफा मागील काही आठवडय़ांपासून पूर्व लडाखमध्ये उड्डाण करत आहे. तेजस लढाऊ विमानाच्या दोन स्क्वॉड्रन्स आणि सुखोई-30 एमकेआय लढाऊ विमानांमध्ये काही स्वदेशी शस्त्रास्त्रांना जोडणे स्वदेशी सैन्य उपकरणनिर्मितीची क्षमता दर्शवितात.