ऑनलाईन टीम / बीजिंग :
चीनच्या झिंजियांग प्रांतात आज पहाटे 5.05 वाजता भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 6.4 रिश्टर स्केल एवढी होती. चिनी माध्यमांनी यासंदर्भात वृत्त दिले आहे.
झिंजिंयाग प्रांतातील यूतियानन क्षेत्राजवळ भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. 10 किमी खोलवर या भूकंपाचे केंद्रस्थान होते. सुदैवाने या भूकंपात कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही. युतियान हे क्षेत्र भारताच्या जवळ आहे. मात्र, भारतात या भूकंपाचे धक्के जाणवले नाहीत.
झिंजिंयाग हा असा भाग आहे, की जिथे चीनने उइगर मुस्लिमांना बंदी बनवले आहे. लडाख प्रदेशापासून काही अंतरावर हा भाग आहे, जिथे भारत आणि चीन मध्ये तणाव आहे.