बीजिंग / वृत्तसंस्था
सात महिन्याचा अंतराळ प्रवास आणि तीन महिने मंगळ ग्रहाच्या कक्षेत भ्रमण केल्यावर चीनचे जुरोंग रोव्हर शनिवारी मंगळ ग्रहावर उतरले. शेवटची सात कठीण मिनिटे यशस्वी पार करून मंगळाच्या पृ÷भागावर अवतरण झाल्यानंतर शास्त्रज्ञांनी आनंद व्यक्त केला. जुरोंग मंगळ पृ÷भागावर उतरल्याने तेथील बर्फ, जमीन यांची अधिक माहिती मिळू शकणार आहे.
चायना नॅशनल स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनने (सीएनएसए) शनिवारी सकाळी हे रोव्हर मंगळाच्या पृ÷भागावर यशस्वीरित्या उतरल्याचे जाहीर केले आहे. चीनचे मंगळ ग्रहावर उतरलेले जुरोंग हे पहिले रोव्हर आहे. त्याने 10 फेब्रुवारी रोजी मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला होता. मंगळासंबंधी महत्वपूर्ण माहिती या रोव्हरकडून प्राप्त होईल, असा दावा चीनने केला आहे. या रोव्हरचे नाव देवावरून ठेवले गेले आहे. जुरोंग हे चिनी अग्नीदेवतेचे नाव आहे. मंगळ सुद्धा अग्नी ग्रह मानला जात असल्याने त्याने नामकरण जुरोंग असे करण्यात आले आहे.