अमेरिकेला देखील त्यांची भीती
चीन स्वतःला महासत्तेचा दर्जा मिळवून देण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. याकरता तो केवळ अर्थव्यवस्थेवरच लक्ष देत असून सायबर सैन्यही तयार करत आहे. त्याच्याकडे हॅकर्सची मोठी फौज असून हे लोक हेरगिरीसह सुरक्षा तोडण्याचेही काम करतात.
2019 मध्ये अमेरिकेच्या संरक्षण विभागाने चीनच्या सायबर अटॅकर्सच्या शक्तीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. चीनमध्ये सैन्यासोबत सायबर आर्मीलाही समान महत्त्व मिळते. या सायबर आर्मीत एकापेक्षा एक हॅकर्स आहेत, त्यांच्या कामाची विभागणी झाली असून यात हेरगिरी करून गुप्त माहिती मिळविणे, सॉफ्टवेअरमध्ये गडबड करणे इत्यादी कामे केली जातात. सैन्यावर खर्च करण्याऐवजी शत्रू देशाला कमकुवत करण्यासाठी सायबर युद्ध सुरू करणे कमी खर्चिक असल्याचे चीनचे मानणे आहे.
चीनच्या सायबर वॉरफेयरची शक्ती 2013 मध्ये सर्वप्रथम जगासमोर आली. त्यादरम्यान अमेरिकच्या सायबर सुरक्षेशी संबंधित कंपनी मॅनडियंटने चीनच्या कृत्यांचा खुलासा करत हायप्रोफाइल सायबर हल्ल्यांमध्ये चीनच्या सायबर सैन्याचा हात असल्याचे सांगितले होते. कंपनीने पुराव्यांसह हल्ल्यांमागे पीपल्स लिबरेशन आर्मीचा तिसरा विभाग कार्यरत असल्याचे नमूद केले होते. ही चीनची इंटेलिजेन्स ब्रँच आहे. याला 61398 या नावानेही ओळखले जाते.
या कोडविषयी जगाला खूपच कमी माहिती आहे. तसेच चीनच्या चेंगडू शहरातून संचालित होणारा हा विभाग आहे. या कोडमध्ये काम करणारे हॅकर्स विविध हजारो सर्व्हर्सवर काम करत असतात. 2014 मध्ये या कोडची इमारत 12 मजली होती आणि परिसर सुमारे 1 लाख 30 हजार चौरस फुटांमध्ये फैलावलेला होत. तेव्हा तेथे हजारो हॅकर्स कार्यरत होते. आता हा आकडा किमान एक लाख असणार आहे.
यादरम्यान युएस-चायना इकोनॉमिक अँड सिक्युरिटी रिह्यू कमिशनचा अहवालही प्राप्त झाला. चीनच्या या सायबर सैन्याचे बळ वाढल्याने युद्ध झाल्यास चीनला प्रत्यक्ष सैन्य उतरविण्याची गरजच भासणार नाही.