ऑनलाईन टीम / बीजिंग :
अमेरिकेने त्यांच्या देशातील चिनी पत्रकारांची हकालपट्टी केल्यानंतर अमेरिकेला प्रत्युत्तर म्हणून चीनने देखील चीनमधील अमेरिकन पत्रकारांची हकालपट्टी करण्याचा विचार केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमेरिकन पत्रकारांच्या ॲक्रिडेशनचे नुतनीकरण करण्यास चीन सरकारकडून चालढकल केली जात आहे.
अमेरिकेत काम करणारे काही चिनी पत्रकार त्यांच्या लष्करासाठी काम करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यानंतर अमेरिकेने काही चिनी पत्रकारांची हकालपट्टी केली होती. त्यामुळे अमेरिकेच्या या कारवाईला प्रत्युत्तर देण्याचा चीनचा प्रयत्न आहे. अमेरिकन पत्रकारांना चीनकडून अशाच स्वरूपाच्या कारवाईला भविष्यात तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.
अमेरिकेने त्यांच्या देशातील चिनी पत्रकारांच्या ॲक्रिडेशनचे नूतनीकरण लांबवले होते. वॉल स्ट्रीट जनरल आणि ब्लुमबर्ग या संस्थांच्या प्रतिनिधींनाही अशाच स्थितीला तोंड द्यावे लागले होते.