ऑनलाईन टीम / बीजिंग :
चीनच्या उत्तरेकडील हुबेई प्रांतात आज सकाळी भूकंपाचे दोनदा धक्के जाणवले. सकाळी 6.38 मिनिटांनी तांगशान शहराला 5.1 तीव्रतेचे धक्के जाणवले. राजधानी बीजिंगच्या काही भागातही भूकंपाचे हादरे बसले.
ग्यु जिल्ह्यातील तांगशान शहरात झालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तरेकडे 39.78 अक्षांशांवर आणि पूर्वेला 118.4 रेखांशांवर जमिनीखाली 10 किलोमीटरवर होता. त्यानंतर याच जिल्ह्यात सकाळी 7.02 वाजता 2.2 तीव्रतेचा दुसरा भूकंप झाला. भूकंपानंतर रेल्वेतून सर्व प्रवाशांना आपत्कालीन मार्गाने उतरवण्यात आले. तसेच रेल्वेच्या मार्गांची कसून तपासणी केली जात आहे. बचाव पथकेही तैनात केली गेली. मात्र, सुदैवाने यात कोणत्याही जीवित अथवा वित्त हानीचे वृत्त नाही.