जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोना विषाणूसंबंधी महत्त्वाचे विधान करण्यात आले आहे. हा आजार चीनमधून आला नसल्याचे म्हणणे अत्यंत अवघड असल्याचे उद्गार डब्ल्यूएचओचे पदाधिकारी माइक रेयान यांनी काढले आहेत. चीनवर कोरोना विषाणू फैलावल्याचा आरोप जगभरातून होत आहे. डब्ल्यूएचओलाही प्रारंभिक काळात माहिती लपवून ठेवण्याच्या आरोपाला सामोरे जावे लागले आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण चीनमध्येच सापडला होता.
डब्ल्यूएचओचा कथित वेळकाढूपणा आणि चीनच्या लपवालपवीमुळे कोरोना महामारीचे संकट उभे राहिल्याचा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. डब्ल्यूएचओमधून अमेरिका बाहेर पडत असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.
अलिकडेच चीनमध्ये सरकारच्या अधीन काम करणाऱया अनेक प्रसारमाध्यमांनी दुसऱया देशांमधून येणाऱया खाद्यसामग्रीवर कोविड-19 चे अंश मिळाल्याचा दुष्प्रचार चालविला आहे. या दुष्प्रचारात भारतातून निर्यात होणाऱया माशांनाही गोवण्यात आले आहे. अन्य देशांना आता कोविड-19 चा वापर करत अडचणीत आणण्याचा नवा डाव चीनने आरंभिला आहे.