ऑनलाईन टीम / बीजिंग :
चीनमध्ये आता नवीन आजाराने डोके वर काढले आहे. ब्रुसेलोसिस असे या आजाराचे नाव असून, 3245 लोकांना या आजाराचा संसर्ग झाला आहे. लान्झोऊच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
पक्ष्यांच्या संपर्कात आल्यामुळे ब्रुसेलोसिस आजाराचा संसर्ग होत आहे. संसर्गग्रस्त लोकांना ताप, थकवा, डोकेदुखी, स्नायू वेदना यासारखी लक्षणे दिसून येतात. खबरदारी म्हणून लान्झोऊच्या आरोग्य विभागाने शहरातील 21 हजार 847 लोकांची चाचणी केली. त्यामधील 3 हजार 245 जणांना हा ब्रुसेलोसिसची लागण झाल्याचे समोर आले.
डॉक्टर, पशुसंवर्धन आणि प्राण्यांच्या मांसाशी निगडीत काम करणाऱ्या व्यक्तींना ब्रुसेलोसिसला संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. ब्रुसेलोसिसची लस मानवांपर्यंत आलेली नाही. प्राण्यांना ब्रुसेलोसिस होऊ नये, म्हणून लसीकरण केले जाते. दरम्यान, अमेरिकेच्या डिसीज कंट्रोल एन्ड प्रिव्हेंशन सेंटर नुसार या आजाराला माल्टा फेवर असेही म्हटले जाते.