धोकादायक आजारांपासून मिळणार मुक्तता
चीनमध्ये नेजल स्प्रे कोरोना विषाणू लसीची चालू महिन्याच्या मध्याला क्लीनिकल ट्रायल सुरू करण्याची योजना बीजिंग येथील वानताई बायोलॉजिकल फार्मसीने आखली आहे. हे क्लीनिकल ट्रायल रजिस्ट्री डाटामध्ये करण्यात येणार आहे. हा स्प्रे मॅच्योर इन्फ्लुएंजा वॅक्सीन प्रॉडक्शन टेक्नॉलॉजीला अवलंबितो आणि इंजेक्शनच्या तुलनेत नाकात स्प्रेचे लसीकरण करणे सोपे ठरणार आहे. याचे व्यापक उत्पादन करणे आणि वितरण करणे सुलभ ठरणार असल्याचे वैज्ञानिकाने म्हटले आहे.
जिआंगसू या प्रांतातील रोग नियंत्रण केंद्र आणि प्रतिबंधक केंद्राकडून चालविल्या जाणाऱया 720 स्वयंसेवकांशी संबंधित दुसऱया टप्प्यातील अध्ययन 17 नोव्हेंबरपासून सुरू केले जाणार आहे. दोन किंवा तीन आठवडय़ांच्या अंतराने देण्यात आलेल्या लसीचा परिणाम पाहिला जाणार आहे. तसेच सुरक्षा आणि क्षमतेची चाचणी करण्यात येणार आहे, यातून प्रतिरक्षणासंबंधी माहिती कळणार आहे. दुसऱया टप्प्यातील अध्ययनात सुदृढ लोकांमध्ये एका विशिष्ट प्रकारच्या फ्ल्यू विषाणूच्या विरोधात पूर्वीपासूनच अस्तित्वात असलेल्या अँटीबॉडी लसीला कशाप्रकारे प्रभावित करतात, याचे मूल्यांकनही करणार आहे.
चीनने मागील महिन्यात कोरोना विषाणूपासून बचावासाठी स्वतःच्या पहिल्या नेजल स्प्रे लसीच्या परीक्षणास मंजुरी दिली होती. ही लस हाँगकाँग आणि चीनमधील एका सामूहिक मोहिमेच्या अंतर्गत विकसित करण्यात आली आहे. यात युनिवर्सिटी ऑफ हाँगकाँग, शियामेन युनिवर्सिटी तसेच बीजिंग वंताई बायोलॉजिकल फार्मसीचे संशोधक सामील आहेत.
ही लस इम्युन सिस्टीमला सक्रीय करण्यासाठी श्वसन प्रणालीत येणाऱया विषाणूच्या नैसर्गिक संक्रमण मार्गाला उत्प्रेरित करते, अशी माहिती मायक्रोबायोलॉजिस्ट युएन क्वाक युंग यांनी दिली आहे. नव्या लसीची सिस्टॅमिक साइड इफेक्ट होऊ शकत नाहीत, परंतु श्वसन प्रणालीत साइड इफेक्ट होऊ शकतात, म्हणजे अस्थमा आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. नेजल स्प्रेच्या माध्यमातून एच1एन1, एच3एन2 आणि इन्फ्लुएंजा विषाणूलाही रोखले जाऊ शकते.