ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतातील ‘हिरो’ या प्रसिद्ध सायकल कंपनीने चीनवर बहिष्कार टाकत 900 कोटींचा करार रद्द केला आहे.
पूर्व लडाख आणि सिक्कीममधील सीमावादावरून भारत-चीनमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हिरो सायकलने हा करार रद्द करून चीनला मोठा झटका दिला आहे. पुढील तीन महिन्यात हिरोचा चीनसोबत हा करार होणार होता.
कोरोना संकटात अनेक कंपन्या आर्थिक अडचणीत आल्या असतानाही हिरोने कोरोना लढ्यासाठी केंद्र सरकारला 100 कोटी रुपयांची मदत केली होती. हिरो सायकलने चीनसोबतचा आपला सर्व प्रकारचा व्यापार बंद केला असून, कंपनीने जर्मनीत नवीन प्लांट सुरू करण्याची तयारी केल्याची माहिती मिळत आहे