ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय रेल्वेने चीनला आणखी एक दणका दिला आहे. चिनी कंपनीला दिलेले ’44- सेमी हायस्पीड वंदे भारत’ रेल्वेगाड्या बनवण्याचे कंत्राट भारतीय रेल्वेने रद्द केले आहे.
सीआरआरसी कार्पोरेशन लिमिटेड ही चिनी कंपनी गुडगावातील पायोनियर फिल मेड प्रायव्हेट लिमिटेड या भारतीय कंपनीबरोबर भागीदारी करून रेल्वेगाड्यांची निर्मिती करणार होती. मागील महिन्यातच या कंपनीला हा ठेका मिळाला होता. मात्र, भारतीय रेल्वेने हा करणारच रद्द केला आहे.
भारतीय रेल्वेने पुढील आठवड्यात नव्या नियमांनुसार भारतीय कंपनीला प्राधान्य देण्याची अट असलेले टेंडर काढण्याचा निर्णय घेतला आहे. मेक इन इंडियाला प्राधान्य देत एक आठवड्याच्या आत नवीन निविदा काढण्यात येतील, असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.