ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
कोरोना विषाणूसंदर्भात चीनने प्रारंभिक माहिती लपवल्याने त्याचे जगाला परिणाम भोगावे लागत आहेत. कोरोना विषाणूसंदर्भात जागतिक आरोग्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय समुदायाची चीनने वारंवार फसवणूक केली आहे, असा आरोप करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर पुन्हा एकदा निशाना साधला.
व्हाइट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेदरम्यान एका पत्रकाराने डोनाल्ड ट्रम्प यांना चीनसंदर्भात काही प्रश्न विचारले. त्यावेळी ट्रम्प म्हणाले, कोरोना हा चिनी विषाणू असून, संपूर्ण जग चीनच्या कर्मांचे मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम भोगतो आहे. वेळेत माहिती दिली असती तर कोरोनाला चीनमध्येच रोखता आले असते. यााप्रकरणी अमेरिका चीनवर कारवाई करणारच आहे. ते तुम्ही पहालंच, अशी धमकीच ट्रम्प यांनी चीनला दिली.