आणखी 43 मोबाईल ऍप्सवर आणली बंदी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
चीनच्या आणखी 43 मोबाईल ऍप्सवर बंदी आणून भारताने चीनला पुन्हा आर्थिक झटका दिला आहे. या निर्णयामुळे चीनची साधारणतः 50 हजार कोटी रुपयांची हानी होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली. 29 जून 2020 या दिवशी चीनच्या 59 ऍप्सवर बंदी आणण्यात आली होती. भारताचे सार्वभौमत्व, एकात्मता, सुरक्षा व्यवस्था आणि शांतता यांच्या संरक्षणासाठी चिनी ऍप्सवर बंदी आणली गेली आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
ही सर्व ऍप्स बंद करण्यात यावीत, असा आदेश केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाने काढला आहे. त्यामुळे मोबाईल व इंटरनेट सेवा उपलब्ध करणाऱया सर्व कंपन्यांना त्वरित ही ऍप्स काढून टाकावी लागणार आहेत. त्यांचा उपयोग थांबल्याने भारतीय कंपन्यांना पर्यायी ऍप्स तयार करणे आणि ती उपलब्ध करून देण्याची संधी मिळणार आहे. भारताच्या ‘आत्मनिर्भर’ मंत्राला अनुसरून ही कार्यवाही करण्यात येत आहे, असे स्पष्ट केले गेले आहे.
देशहिताच्या रक्षणाला प्राधान्य
देशहिताच्या रक्षणाला प्राधान्य हे भारत सरकारचे धोरण आहे. त्याला अनुसरून भविष्य काळातही आवश्यक ते निर्णय घेतले जातील. अनेक चिनी ऍप्समुळे देशाची सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला धोका निर्माण झाला होता. सायबर गुन्हे संशोधन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार अशा धोकादायक ऍप्सवर बंदी घालण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली, असे प्रतिपादन माहिती तंत्रज्ञान विभागाने केले.
पुढील ऍप्सवर आणली बंदी…
ऑलसप्लायर्स मोबाईल ऍप,
अलिबाबा वर्कबेंच,
ऑलएक्स्पेस-स्मार्टर शॉपिंग, बेटर लिव्हींग,
अलिपे कॅशियर,
लालामूव्ह इंडिया डिलिव्हरी ऍप,
ड्राईव्ह विथ लालामूव्ह इंडिया,
स्नॅक व्हिडीओ,
कॅमकार्ड-बिझनेस कार्ड रिडर,
कॅमकार्ड-बीसीआर वेस्टर्न,
सोल-फॉलो द सोल टू फाइंड यू,
चायनीज सोशल- फ्री ऑनलाईन डेटिंग व्हिडीओ ऍप अँड चॅट,
डेट इन एशिया- डेटिंग अँड चॅट फॉर एशियन सिंगल्स,
वुई डेट- डेटिंग ऍप,
फ्री डेटिंग ऍप- सिंगोल स्टार्ट युवर डेट,
ऍडोअर ऍप,
ट्रूली चायनीज- चायनिज डेटिंग ऍप,
ट्रूली एशियन- एशियन डेटिंग ऍप,
चायनालव्ह- डेटिंग ऍप फॉर चायनिज सिंगल्स,
डेटमायएज- चॅट, मीट, डेट मॅच्युअर सिंगल्स ऑनलाईन,
एशियन डेट- फाईंड एशियन सिंगल्स,
फ्लर्टविश- चॅट विथ सिंगल्स
गेज ओन्ली डेटिंग- गे चॅट,
टय़ूबिट- लाईव्ह स्ट्रीम्स,
वुई वर्क चायना,
फर्स्ट लव्ह लाईव्ह- सुपर हॉट लाईव्ह ब्युटीज ऑनलाईन,
रेला-लेस्बियन सोशल नेटवर्क,
कॅशियर वॅलेट,
मँगो टीव्ही,
एमजी टीव्ही- हय़ूमन टीव्ही ऑफिशियल टीव्ही ऍप,
वुई टीव्ही- टीव्ही व्हर्शन,
वुई टीव्ही- सीड्रामा, केड्रामा अँड मोअर,
वुई टीव्ही लाईट,
लकी लाईव्ह- लाईव्ह व्हिडीओ स्ट्रीमींग ऍप,
टोबो लाईव्ह,
डिंग टॉक,
आयडेंटिटी व्ही,
आयसोलँड टू- ऍशेस ऑफ टाईम,
बॉक्सस्टार- अर्ली ऍक्सेस,
हीरोज इव्हॉल्व्ह्ड,
हॅपी फिश,
जेलीपॉप मॅच- डेकोरेट युवर ड्रीम आयलँड,
मंचकिन मॅच- मॅजिक होम बिल्डिंग,
काँक्विस्टा ऑनलाईन