जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार होण्यास चीन कारणीभूत असतानाच, चीनमध्ये निर्माण झालेली कोरोना लसही आता वादाच्या भोवऱयात सापडली आहे. ही लस घेतल्यानंतर अनेक चित्रविचित्र अनुभव येतात, असे अनेकांनी सांगितले आहेत. सध्या यासंबंधातील एक व्हिडीओ प्रसारित होत असून चांगलाच लोकप्रिय झाला आहे. त्यात चीनी लस घेतल्यानंतर रूग्ण वेगळीच भाषा बोलू लागल्याचे चित्रण दिसून येते. चीनच्या लसीची थट्टा करण्यासाठी तो तयार केला गेला आहे.
या व्हिडीओत असे दिसते की एक व्यक्ती इंग्रजीतून सांगयोय की त्याने चीनी लस घेतली आहे. तो पुढे असेही म्हणतो की या लसीचा कोणताही खास दुष्परिणाम त्याला अनुभवावयास मिळालेला नाही. पण बोलता बोलता त्याचा आवाज आणि चेहरा बदलत जातो. आणि नंतर तर तो इंग्रजी न बोलता वेगळीच भाषा बोलू लागतो. प्रथमदर्शनी हा व्हिडीओ खराच वाटतो.
पण शेवटपर्यंत पाहिला असता तो खरा नसून चीनी लसीची ती थट्टा असल्याचे समजून येते. या व्हिडीओचा उद्देशही तोच असल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे. एकंदर, कोणताही चीनी माल ज्याप्रमाणे बनावट असतो, त्याप्रमाणेही चीनची लसही आहे. ती विश्वासार्ह नाही असे सांगण्याचा या व्हिडीओचा हेतू आहे.
चीनबद्दल जगात किती अविश्वासाचे वातावरण आहे हे यातून स्पष्ट होते. हा व्हिडीओ खोटा आहे हे माहीत असूनही अनेकांनी तो फॉरवर्ड केला असून लक्षावधींनी तो पाहिलाही आहे. अनेकांनी त्यावर मजेदार शेरेही मारले आहेत. दुसरी कोणतीही भाषा शिकण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे चीनी लस ही प्रतिक्रिया तर विशेष लोकप्रिय झाली असून या व्हिडीओने चांगलेच मनोरंजन होत आहे.