समुद्रात आता चीन सर्वात शक्तिशाली- अमेरिकेला टाकले मागे
वृत्तसंस्था/ बीजिंग
अमेरिकेला मागे टाकून चीन जगातील सर्वात मोठी नौदल शक्ती ठरला आहे. चिनी नौदलात सामील युद्धनौका आणि पाणबुडय़ांचे प्रमाण आता अमेरिकेपेक्षा अधिक झाले आहे. पण इतकी शस्त्रास्त्रs असूनही चीनची युद्धक्षमता जगातील अनेक देशांच्या तुलनेत तोकडीच आहे. चिनी अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी काही वर्षांपूर्वी स्वतःच्या नौदलाला जगातील सर्वात मोठय़ा शक्तीचा मान मिळवून देण्याचा निश्चय केला होता.
2018 मध्ये चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्हीने दक्षिण चीन समुद्रात स्वतःच्या सामरिक सामर्थ्याचे प्रदर्शन केले होते. यात एकाचवेळी 48 युद्धनौका, अनेक लढाऊ विमाने आणि 10 हजारांहून अधिक नौसैकि सामील झाले होते. युएस ऑफिस ऑफ नेव्हल इंटेलिजेन्सनुसार 2020 पर्यंत समुद्रात चीनने 360 हून अधिक युद्धनौकांना तैनात केले आहे. अमेरिकेच्या नौदलाचा हा खुलासा जगभरासाठी एकप्रकारे धोक्याचा इशारा आहे.
चीन संरक्षण क्षेत्रावर प्रचंड खर्च करत असल्याने त्याचे विस्तारवादी धोरण आगामी काळात जगाला युद्धाच्या दिशेने लोटू शकते. चीनने नेव्हल शिपयार्डला युद्धनौका सर्वोत्तम असायला हवी असा निर्देश दिल्याची माहिती युएस नेव्हल वॉर कॉलेजचे ऍन्ड्रय़ू इरिक्शन यांनी दिली आहे.
चिनी नौदलाने 2015 मध्ये स्वतःचे सामर्थ्य अमेरिकेच्या नौदलाच्या पातळीवर आणण्यासाठी व्यापक मोहीम चालविली होती. चीनला पुढे जाताना पाहून अमेरिकेचे नौदल आगामी काळात स्वतःच्या युद्धनौकांची संख्या 297 वरून 355 दरम्यान करण्याच्या तयारीत आहे.