चीनने स्वतःच्या एका मोठय़ा शहरात सुमारे 5 दशलक्ष लोकांची चाचणी करण्यास प्रारंभ केला आहे. तसेच पूर्ण क्षेत्रात पुन्हा टाळेबंदी लागू करण्याची तयारी चालविली आहे. शिनजियांग प्रांतातील काशगर भागात कोरोनाचे संकट निर्माण झाले आहे. तेथे एक कोरोनाबाधित सापडला आहे. चाचणी मोहिमेदरम्यान आतापर्यंत 137 अतिरिक्त रुग्ण आढळले आहेत. चीनमध्ये मागील 7 महिन्यांमध्ये हा आकडा सर्वाधिक ठरला आहे. काशगर येथे उइगूर मुस्लिमांचे प्रमाण अधिक आहे.
Previous Articleइटलीत कठोर निर्बंध
Next Article बर्लिनसाठी अवघड काळ
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.