बीजिंग
साधारणपणे ऍलन मस्क यांची कंपनी स्टारलिंकने भारतासह जगभरामध्ये आपल्या सॅटेलाइट हाय स्पीड इंटरनेट सेवेसाठी बुकिंग प्रक्रिया सुरु केली आहे. या उपकरणाच्या माध्यमातून वेगवान इंटरनेट सेवा उपलब्ध करुन देण्यासह अन्य ठिकाणी सेवा देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे. परंतु सध्या चीन स्टारलिंकपेक्षाही वेगवान नेटवर्क निर्माण करणार असून अंतराळामध्ये सॅटेलाईट नेटवर्क बनविण्याच्या तयारीमध्ये आहे. ज्याच्या आधारे वेगवान इंटरनेट सेवा देणार असल्याचे संकेत आहेत. चीनच्या एरोस्पेस साइंट ऍण्ड टेक्नालॉजी ग्रुपच्या साइंट ऍण्ड टेक्नालॉजीचे संचालक आणि चायनीज पीपुल्स पॉलिटिकल कंसल्टेटिव्ह कॉन्प्रेसचे सदस्य बाओ वेइमिन यांनी चीनच्या माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार चीन स्पेस सॅटेलाईट विकसित करण्याची योजना आखत असल्याचे सांगितले आहे. वेइमिन यांनी दिलेल्या माहितीनुसार चीनने सॅटेलाईटची चाचणी केली असून इंटरनेट नेटवर्क निर्मितीचे कार्य आणि नियोजन करण्यावरही भर दिला जात असल्याची माहिती आहे. वर्ष 2020 मध्ये सॅटेलाइट इंटरनेट चीनच्या नवीन नियोजनानुसार समाविष्ठ केली आहे. यामध्ये अंतराळातील सॅटेलाईट इंटरनेट, तसेच ग्रामीण भागातील लोकांना सी ऍप्लिकेशन्स सादर करण्यावर काम सुरु आहे. सदरच्या सेवेत दूरसंचार सेवा केंद्राच्या विना संचार सेवांर भर देण्याचे संकेत असल्याचेही स्पष्ट केले आहे. मोबाईल टॉवर प्रमाणे सदरची सेवा काम करणार असल्याचे सांगितले आहे.