ऑनलाईन टीम / बिजींग :
चीनमधील 20 हजार कोरोनाग्रस्तांना ठार मारण्याची परवानगी चीन सरकारनेच सुप्रीम पीपल्स कोर्टाला मागितल्याचे वृत्त कालपासून काही संकेतस्थळांवरुन प्रसिद्ध होत होते. हे वृत्त खोटे असून, कोरोनाग्रस्तांवर व्यवस्थित उपचार सुरू असल्याचे चीन सरकारकडून सांगण्यात येत आहे.
कोरोना या जीवघेण्या विषाणूमुळे चीनमध्ये 630 लोकांचे बळी घेतले आहेत. तर अंदाजे 30 हजार लोकांना याचा संसर्ग झाला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि अन्य आरोग्य कर्मचाऱयांनाही या विषाणूंचा संसर्ग होऊ लागला असून आतापर्यंत वीस डॉक्टर याला बळी पडले आहेत.
त्यामुळे या विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी चीन कोरोनाग्रस्त 20 हजार रुग्णांचा बळी देणार आहे. त्यासाठी चीन सरकारनेच सुप्रीम पीपल्स कोर्टाकडे त्यासंदर्भातील परवानगी मागितल्याचे वृत्त कालपासून प्रसिद्ध होत होते. याउलट कोरोनाच्या लढय़ासाठी रुग्णालये कमी पडत असल्याने चीन नवीन रुग्णालये निर्माण करत असल्याचे समजते.