ऑनलाईन टिम / नवी दिल्ली
चुकीची माहिती पसरवल्याबद्दल पाकिस्तानमधील चार वृत्तवाहिन्यांसह 22 यूट्यूब चॅनेल ब्लॉक केले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही कारवाई केली. याबाबतची माहीती मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने ट्विटरद्वारे दिली.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित चुकीची माहीती पसरवल्याबद्दल ही कारवाई केली.या कारवाईत तीन ट्विटर अकाऊंट, एक फेसबुक अकाउंट आणि एक न्यूज वेबसाइटही ब्लॉक केली आहे. डिसेंबर 2021 पासून, आतापर्यंत 78 YouTube चॅनेल ब्लॉक केले गेले आहेत.