क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
कै.चुडाप्पा हलगेकर कुस्ती प्रोत्साहन समितीची वार्षिक बैठक शुक्रवारी मोठय़ा उत्साहात पार पडली. सरकारी नियमानुसार यावषी रौप्यमहोत्सवी कुस्ती मैदान भरविण्याचा एकमताने ठराव मंजुर करण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शंकर मुचंडीकर होते.
गेली 24 वर्षे चुडाप्पा हलगेकर कुस्ती समितीतर्फे आनंदवाडीच्या आखाडय़ात भव्य कुस्ती मैदान भरविण्याची परंपरा चालू ठेवली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाने गेल्या मार्चपासून कुस्ती परंपरा खंडित पडली पडली होती. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भा कमी होत चालला आहे. फेब्रुवारीत चुडाप्पा हलगेकर कुस्ती समितीची 25 वर्षे पूर्ण होत असून, रौप्य महोत्सवानिमित्त भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्याचे एकमताने ठरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर गुलाब जंगू शेख, आनंद जाधव, अशोक हलगेकर उपस्थित होते. अशोक हलगेकर यांनी मागील वर्षाचा आढावा सादर केला. गेल्या वषी हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, कुस्ती प्रशिक्षक के. एम. पाटील, सादीक पंजाबी, मल्लू कुडची, जीवाप्पा दऱयाण्णावर आदी ज्ये÷ मल्लांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. फेबुवारीत होणाऱया कुस्ती मैदानासाठी प्रशिक्षक मारूती घाडी, ठेकेदार बाळाराम पाटील यांनी बक्षीस देण्याचे जाहीर केले. रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून यावषी कुस्तीबरोबरच दंड-बैठका, खोखो, कब्बड्डी अशा विविध खेळांचेही आयोजन करण्यात येणार आहे. बेळगावच्या सर्व सहकाऱयांच्या मदतीने यावषीचे कुस्ती मैदान यशस्वी करूया, असे शंकर मुचंडी यांनी सांगितले. या बैठकीला प्रभाकर हलगेकर, गजानन घोरपडे, मधू वेर्लेकर, नितीन चौगुले, सदानंद हलगेकर, अनिल चौगुले, राजू जाधव, आनंद जांबोटकर, महेश पाटील, ईश्वर पाटील, सुनील हुक्केरीकर, विनोद जाधव, धनंजय हदगल, अरूण पाटील आदी सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक हलगेकर यांनी तर अनिल चौगुले यांनी आभार मानले.