प्रतिनिधी /पर्वरी
शिक्षण संचालनालय गोव्यातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचविण्यासाठी अनेक उपक्रम राबवित असून त्याचाच एक भाग म्हणून ता.15 नोंव्हेबर रोजी संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या हस्ते त्यांच्या पणजी येथील शासकीय निवासस्थानात विद्या समीक्षा केंद्र (गोवा) अंतर्गत चॅट बॉक्स (प्रकाश) या ऍपचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
राज्य शिक्षण संचालनालयाचे संचालक शैलेश झिंगडे यांनी दिली. यावेळी त्यांच्या समवेत राज्य शिक्षण संचालनालयाचे संचालक नागराज होन्न?गिरी उपस्थित होते.
राज्य शिक्षण संचालनालयाने कनव्हेजिनियस यांच्याशी करार करून हे अप् सुरू केले असून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे अंतर्गत विद्या समीक्षा केंद्र (गोवा) सुरू करण्यात आले आहे. या केंद्रा मार्फत गोव्यातील सर्व शाळा ,विद्यार्थी आणि शिक्षक यांची नोंदणी केली जाईल. प्रत्येक विद्यार्थी ,शिक्षक यांना युनिक आयडी देण्यात येणार आहे. त्या आयडी मार्फत प्रत्येक विद्यार्थ्यांची शिक्षण संबंधीची माहिती गोळा करणे शक्मय होईल. त्याद्वारे त्या विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगतीचा आलेख स्पष्ट होईल.असे संचालक होन्न?गिरी यांनी सांगितले.
शैक्षणिक माहिती गोळा करणे,त्याचे विश्ल?षण आणि मूल्यमापन करणे हे विद्या समीक्षा केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचविण्याचे काम हे केंद्र करणार आहे. या उपक्रमाद्वारे प्रत्येक शाळा आणि प्रत्येक विद्यार्थी यांच्या शैक्षणिक स्तर समजण्यास मदत होईल. तसेच प्रत्येक शनिवारी दोन विषयांचे 12 प्रश्न देण्यात येणार आहे. त्यांनी त्या प्रश्नांची पुढच्या शुक्रवार पर्यंत उत्तरे देणे बंधनकारक असून त्या द्वारे त्या विद्यार्थ्याला त्या धडय़ाचे आकलन झाले आहे हे समाजाने शक्मय होईल. असे संचालक होन्न?गिरी यांनी सांगितले.
विद्या समीक्षा केंद्र हे विद्यार्थी व्यवस्थापन,शिक्षक व्यवस्थापन,शाळा व्यवस्थापन,शिक्षण परिणाम व्यवस्थापन, मूल्यांकन व्यवस्थापन, सर्वेक्षण व्यवस्थापन,संप्रेषण आणि घोषणा,अहवाल आणि विश्ल?षण आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांना मदत करणे या प्रमुख घटकावर भर देणार आहे.या अप् द्वारे गोव्यातील कुठल्याही काना कोपऱयातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख पाहणे शक्मय होईल. तसेच जर एखादा विद्यार्थी एखाद्या विषयात मागे असेल तर वेळीच उपाययोजना करणे शक्मय होईल. शिक्षण संचालनालय,गोवा शालान्त मंडळ,गोवा समग्र शिक्षा हे या माहितीचा उपयोग करून शिक्षणतील उणिवा,विद्यार्थ्यांचे प्रश्न शाळेची एकंदर प्रगती यांची माहिती घेऊन त्यावर उपाय योजना करणे शक्मय होईल. असे संचालक होन्न?गिरी यांनी सांगितले.
आतापर्यंत जवळजवळ दोन लाख सत्तर हजार विद्यार्थी आणि तेरा हजार पाचशे शिक्षक यांची नोंदणी झाली आहे. हे अप् केवळ गोव्यातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारणे आणि देशपातळीवर आमची शैक्षणिक पातळी सुधारणे हा हेतु आहे.गुजरात राज्यात याची सुरवात झाली आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी गुजरात मध्ये जावून या अप् ची माहिती घेतली आहे. त्यानंतरच हा उपक्रम गोव्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे.या अप् द्वारे रचनात्मक मूल्यांकन आणि उपचारात्मक शिक्षण यातील अंतर भरून काढणे,मुलाना त्यांच्या सोयी नुसार कुठेही आणि कोणत्याही वेळी शैक्षणिक विडिओ द्वारे शिकणे ,गणितातील कौशल्ये आणि ज्ञानात भर घालणे,ऐकणे ,लेखन,व्याकरण आणि शब्द संग्रह ही भाषा कोशल्ये यांना बळकटी देणे,मराठी आणि इंग्रजी या भाषांचे मौखिक कौशल्य सुधारणे तसेच त्वरित शंका निरसन करणे शक्मय होईल. असे शिक्षण संचालक झिंगडे यांनी सांगितले.