म्युनिच : प्रत्येक हंगामात किमान बाद फेरीपर्यंत पोहोचण्याची बार्सिलोनाची चॅम्पियन्स लीग स्पर्धेतील 17 वर्षांची परंपरा यंदा खंडित झाली आहे. बार्सिलोनाला बुधवारी घरच्या मैदानावर खेळणाऱया बायर्न म्युनिचविरुद्ध 0-3 फरकाने पराभूत व्हावे लागले. ई गटात ते तिसऱया स्थानी राहिले.
‘आम्ही पुन्हा एकदा नव्याने, शून्यापासून सुरुवात करत आहोत’, असे बार्सिलोनाचे प्रशिक्षक झेवी हर्नांडेझ येथे म्हणाले. हर्नांडेझ मागील महिन्यातच बार्सिलोना संघाचे प्रशिक्षक या नात्याने रुजू झाले आहेत.
बायर्नने या दरम्यान सलग 6 विजय मिळवले असून सप्टेंबरमध्ये कॅम्प नोयू येथे त्यांनी 3-0 असा पहिला दमदार विजय नोंदवला होता. चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या बाद फेरीत पोहोचणारे 16 पैकी 15 संघ आता निश्चित झाले आहेत.
ऍटलांटा-व्हिलारेल यांच्यात उत्तर इटलीतील बर्गामो शहरात लढत होणे अपेक्षित होते. मात्र, बर्फवृष्टीमुळे ही लढत होऊ शकली नाही. ही लढत लवकरच होण्याची शक्यता आहे.