वृत्तसंस्था/ पॅरीस
2023 च्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेतील फायनल इस्तंबूलमध्ये होणार असल्याची घोषणा युफाने शुक्रवारी केली आहे. कोरोना महामारी समस्येमुळे चॅम्पियन्स लीगच्या गेल्या दोन स्पर्धावेळी ठिकाणामध्ये शेवटच्या क्षणी बदल करण्यात आला होता. या स्पर्धा तुर्कीश सिटीतून पोर्तुगालमध्ये घेण्यात आल्या.
2020 च्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेवर कोरोना महामारीचा विपरित परिणाम झाला होता. या स्पर्धेतील अंतिम आठवी स्पर्धा इस्तंबूल येथून लिस्बनमध्ये घेतली गेली.