गॉड गिफ्ट 13 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा
प्रतिनिधी/ बेळगाव
आनंद क्रिकेट अकादमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गॉड गिफ्ट 13 वर्षांखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हुबळी येथील चॅम्पियन नेट कोचिंग सेंटरने विजेतेपद पटकाविले. चॅम्पियन अकादमीने बेळगाव स्पोर्ट्स क्लबवर 33 धावांनी विजयी मिळविला. या संपूर्ण मालिकेत सर्वोत्तम कामगिरी केलेल्या लाभ वेर्णेकर याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
मंगळवारी भुतरामट्टी येथील भगवान महावीर स्कूलच्या मैदानावर हा अंतिम सामना घेण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना चॅम्पियन नेट अकादमीने 25 षटकात 4 बाद 139 धावा जमविल्या. भुवन बस्सीडोणे याने नाबाद 61 धावा, मुस्तफार गोकाक याने 18 धावा जमविल्या. वरद सुर्यवंशी 2, अथर्व दिवटे 1 तर लाभ वेर्णेकरणे 1 बळी घेतला. प्रत्युत्तरादाखल बेळगाव स्पोर्ट्स क्लबने 25 षटकात 8 बाद 106 धावा केल्याने आशुतोष हिरेमठ 23, अथर्व दिवटे 17, तेजस कडाडी याने 10 धावा केल्या. भुवन बस्सीडोणे 2, विशाल डोंगरे, सुप्रित जामनूर याने प्रत्येकी 1 गडी बाद केला. त्यामुळे चॅम्पियन नेट अकादमीने 33 धावांनी विजय मिळविला. या सामन्यात भुवन बस्सीडोने हा सामनावीर ठरला.
मालिकेमध्ये सर्वोत्कृ÷ फलंदाज म्हणून आशुतोष हिरेमठ, सर्वोत्कृ÷ गोलंदाज संजना वेर्णेकर याला गौरविण्यात आले. रणजीपट्टू सचिन शिंदे, माजी रणजीपट्टू नंदकुमार माळवाडकर, लिंगराज बी., चॅम्पियन नेट अकादमीचे प्रशिक्षक संदेश बैलप्पण्णावर, बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे प्रशिक्षक प्रमोद पालेकर, हसीन गोकाक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.