नवी दिल्ली / वृत्तसंस्था
चेन्नई सुपरकिंग्सचे गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी यांना कोरोनाची बाधा झाली असून यामुळे दिल्लीतील आणखी काही सामन्यांबाबत साशंकतेचे वातावरण तयार झाले आहे. सध्या केकेआरचे पूर्ण पथक 6 दिवसांच्या हार्ड क्वारन्टाईनमध्ये असून स्वतः लक्ष्मीपती बालाजी देखील आयसोलेट झाले आहेत. यापूर्वी चेन्नई-मुंबई यांच्यात मागील लढत झाली, त्यावेळी बालाजी यांनी मुंबईतील खेळाडूंशी देखील काही वेळा संवाद साधला होता. अहमदाबादमधील केकेआर-आरसीबी यांच्यातील सामना लांबणीवर टाकला गेल्यानंतर आज (मंगळवार) मुंबई इंडियन्स-सनरायजर्स हैदराबाद तसेच उद्या (बुधवार) चेन्नई-राजस्थान यांच्यातील सामन्यांवर अनिश्चिततेची टांगती तलवार कायम असेल, असे एका अधिकाऱयाने गोपनियतेच्या अटीवर नमूद केले.