वृत्तसंस्था/ पणजी
इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या उर्वरित हंगामासाठी चेन्नईन एफसी संघामध्ये नेरीजस व्हॅलस्किसचे पुनरागमन झाले आहे. शनिवारी चेन्नईन एफसी संघाच्या व्यवस्थापकांनी ही घोषणा केली आहे.
लुथिआनियन फुटबॉलपटू व्हॅलस्किसबरोबर चेन्नईन एफसी संघाने इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या उर्वरित हंगामासाठी नुकताच नवा करार केला. 2019-20 सुपर लीग फुटबॉल हंगामात व्हॅलस्किसने पदार्पण करताना 20 सामन्यात 15 गोल नोंदविले. या कामगिरीमुळे चेन्नईन एफसीने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता त्यावेळी व्हॅलस्किसला गोल्डन बुटचा पुरस्कार देण्यात आला होता. व्हॅलस्किसने चालू वर्षांच्या इंडियन सुपर लीग फुटबॉल हंगामात यापूवौ जमशेदपूर एफसी संघाचे प्रतिनिधीत्व करताना 10 गोल नोंदविले आहेत.