वृत्तसंस्था/ लंडन
प्रिमियर लिग फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी येथे झालेल्या सामन्यात चेल्सीने टोटेनहॅम हॉटस्परचा 1-0 अशा गोलफरकाने पराभव केला. या विजयामुळे चेल्सी संघाने स्पर्धेच्या गुणतक्त्यात 6 व्या स्थानावर झेप घेतली आहे.
गुरुवारच्या सामन्यात चेल्सीतर्फे एकमेव निर्णायक गोल 24 व्या मिनिटाला जॉर्गिनोने पेनल्टीवर नोंदविला. टोटेनहॅम संघाला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. 2012 पासून या स्पर्धेत प्रथमच टोटेनहॅम हॉटस्पर संघाला साखळी फेरीतील सलग तीन सामने गमवावे लागत आहेत. स्पर्धेच्या गुणतक्त्यात चेल्सीचा संघ 36 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. टोटेनहॅम संघाला 8 व्या स्थानावर समाधान मानावे लागत आहे. त्यांनी 33 गुण मिळविले आहेत.