वृत्तसंस्था/ लंडन
शनिवारी येथे चेल्सी महिला फुटबॉल संघाने कम्युनिटी शिल्ड महिलांची फुटबॉल स्पर्धा जिंकली. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात चेल्सी क्लबने मँचेस्टर सिटीचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव केला.
कोरोना महामारीमुळे ब्रिटनमध्ये तब्बल सहा महिन्यानंतर महिलांच्या फुटबॉल स्पर्धेला पुन्हा प्रारंभ करण्यात आला होता. या अंतिम सामन्यात चेल्सीतर्फे मिली ब्रिगेट आणि इरिन क्यूथबर्ट यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. तब्बल 12 वर्षांनंतर पहिल्यांदाच महिलांसाठी कम्युनिटी शिल्ड फुटबॉल स्पर्धा येथे खेळविली गेली.