सद्यकाळात लोकांमध्ये टॅटूबद्दल प्रचंड क्रेझ आहे. पूर्वीही अनेक आदिवासी समुदायांचे लोक टॅटू काढत होते, एकप्रकारे स्वतःचे मन शरीरावर व्यक्त करण्याची ही पद्धत होती. आता एका महिला अँकरने स्वतःच्या चेहऱयावर टॅटू काढून घेत सर्वांना चकित केले आहे.
27 डिसेंबर रोजी ओरिनीने न्यूजहब चॅनेलवर शोचे सूत्रसंचालन केले. यादिवशी नियमित सूत्रसंचालक सॅम हायस आणि माइक मॅक रॉबर्टस उपस्थित नव्हते. सॅम हायस सध्या मातृत्व रजेवर आहे. यामुळे हा शो ओरिनीला होस्ट करावा लागला. याप्रकरणी लोकांनी अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया देत चॅनेलचे कौतुक केले आहे.
ओरिनीने 2017 मध्ये चेहऱयावर टॅटू काढून घेतला होता. 2017 मध्ये तिने स्वतःची डीएनए चाचणी करविली होती. यात ती 100 टक्के माओरी असल्याचे स्पष्ट झाले होते. माओरी समुदायाच्या महिलांप्रमाणे टॅटू काढून घेण्याचा निर्णय तिने घेतला.
ओरिनीने यापूर्वीही 2019 मध्ये मुख्य चॅनेलवर वृत्तवाचन केले होते. नाताळावेळी वाहिनीवर झळकल्याने अत्यंत आनंदी असल्याचे ओरिनीने म्हटले आहे. अशाप्रकारच्या टॅटूसह शो करण्याचा इतिहास तिने रचला आहे. ओरिनीला लवकरच प्राइम टाइमचा स्पॉट मिळेल अशी अपेक्षा सोशल मीडियावर अनेक जण व्यक्त करत आहेत. स्वतःच्या मूळांशी जोडून राहणाऱयाला यश नक्की मिळते अशी शिकवण ओरिनीच्या कहाणीतून घेतली जाऊ शकते.