वार्ताहर /जुने गोवे
साऊद चोडण येथील संज्यांव डब्लू. ए. एम. कौन्सिल आणि लायन्स क्लब चोडणतर्फे 24 जून रोजी स. 11.00 वा. पासून साऊद चोडण येथे पारंपरिक पद्धतीने सांज्यांव साजरा करण्यात येईल. यानिमित्त विविध कार्यक्रम वस्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. उत्कृष्ट कोपेल( मुकूट), उत्कृष्ट वेषभूषा, उत्कृष्ट कांतार, उत्कृष्ट लोकनृत्य आदीसाठी आकर्षक बक्षिसे देण्यात येतील. तसेच अन्य विविध बक्षिसेही देण्यात येईल. मोठय़ा संख्येने उपस्थित राहून पारंपरिक साज्यांव उत्सव यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.