7 लाखांचे दागिने, 1 लाख 80 हजार रक्कमेचा समावेश
प्रतिनिधी/ सातारा
शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी, घरफोडी अशा प्रकारच्या झालेल्या गुह्याचा शोध घेऊन चोरीस गेलेले दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली होती. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने चोरीस गेलेले 7 लाख रुपयांचे दागिने, 1 लाख 80 हजार रुपये रोख रक्कम फिर्यादीना सुपूर्त करण्यात आली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर उपस्थित होते.
Rयावेळी अप्पर पोलीस अधीक्षक बोऱहाडे म्हणाले, सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या चोरीच्या घटना उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी गेल्या होत्या. त्यानुसार सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर व त्यांच्या सहकाऱयांनी चोरीस गेलेले दागिने व रोख रक्कम परत मिळविण्यात यश मिळवले. शिवाजी साहेबराव चव्हाण (रा. खिंडवाडी, ता. सातारा), शोभा राजाराम कदम (रा. प्रतापसिंहनगर, सातारा), इंदुबाई आप्पा काळे (रा. विठ्ठलकृपा कॉलनी, देशमुखनगर, कृष्णानगर, सातारा) आणि अश्विनी अरविंद उदगीर (रा. प्रियदर्शनी अपार्टमेंट, एन. व्ही रोड, चूनाभट्टी, मुंबई) अशी मुद्देमाल परत दिलेल्यांची नावे आहेत.
यापूर्वीच शहर पोलिसांनी 74 बेवारस गाडय़ांचा कायदेशीर प्रक्रिया राबवून लिलाव करून 2 लाख 40 हजार रुपये शासनाकडे जमा केले आहेत. रस्त्यावर केक कापणाऱया 16 जणांवर कारवाई केली आहे. सातारा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय कॉलेज परिसरात मारामारी करून दहशत पसरवणाऱया 11 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. महाराष्ट्र, गुजरात या राज्यांमध्ये ट्रक, टेंपो व इतर चारचाकी वाहनांचे थकीत हप्ते भरून ती वाहने चालवण्यासाठी घेऊन त्या वाहनांची परस्पर विक्री करून फसवणूक करणाऱया टोळीचा पर्दाफाश करून 5 कोटी रुपयांची वाहने जप्त करण्यात आली आहेत.