ऍस्ट्रोजेनेका लसीच्य ब्ल्यूप्रिंटची केली चोरी – ब्रिटन
वृत्तसंस्था/ लंडन
ऑक्सफोर्डच्या कोरोना लसीवरून ब्रिटनने खळबळजनक दावा केला आहे. रशियाने ऑक्सफोर्ड/ऍस्ट्राजेनेकाच्या लसीचा ब्ल्यूप्रिंट चोरला आणि त्यानंतर स्वतःची स्पुतनिक लस तयार केली. रशियाच्या हस्तकाने ऑक्सफोर्डच्या लसीचे डिझाइन रशियाला दिल्याचे ब्रिटनच्या सुरक्षा विभागाच्या सूत्रांनी म्हटले आहे.
रशियासाठी काम करणाऱया हेरांनी ऍस्ट्राजेनेका कंपनीमधून लसीचे डिझाइन चोरल्याचे ठोस पुरावे आहेत. एका विदेशी हस्तकाने लसीचा ब्ल्यूप्रिंट आणि आवश्यक माहिती चोरल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
स्पुतनिक व्ही ही लस घेतल्याचा दावा काही महिन्यांपूर्वी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी केला होता. कोरोनाविरोधी युद्धासाठी लस घेण्याचे आवाहन पुतीन यांनी रशियाच्या जनतेला केले होते. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये मॉस्को येथे झालेल्या दोन प्रारंभिक वैद्यकीय चाचण्यांचे निष्कर्ष ब्रिटनमधील प्रतिष्ठित जर्नल द लॅन्सेटमध्ये प्रकाशित झाले होते. ऑक्सफोर्डच्या लसीकरता वापरण्यात आलेले तंत्रज्ञानच रशियन लस स्पुतनिकमध्ये वापरण्यात आले आहे. रशियाच्या चाचण्यांमध्ये केवळ 76 लाख सामील होते आणि यातील निम्म्या लोकांनाच लस देण्यात आली होती.