प्रतिनिधी/ रत्नागिरी
जाकादेवी बँक दरोडय़ाच्यावेळी बँक मॅनेजर तक्रारीसाठी पोलीस ठाण्यात गेल्या तेव्हा चोरीच्या रकमेबाबत बँकेचे कोणतेही कागदपत्रे घेवून गेल्या नव्हत्य़ा तसेच चोरीच्या रकमेबाबत कोणताही रेकॉर्ड जप्त करण्यात आलेला नव्हत़ा पोलिसांनी ही प्रक्रिया जाणीवपूर्वक अवलंबल़ी कारण आरोपींकडून जप्त रक्कम किती दाखवता येईल, हे अगोदरच निश्चित करायचे आणि त्यानुसार एक आकडा फिर्यादीत नमूद करायचा होत़ा नंतर बँकेचीच ही रक्कम घेवून आरोपी यांच्याकडून डिस्कवरी व जप्ती करताना वापरता येवू शकणारी होती, असा युक्तीवाद ऍड़ संकेत घाग यांनी न्यायालयापुढे केल़ा
रत्नागिरी सत्र न्यायाधीश विनायक राजाराम जोशी यांच्या न्यायालयापुढे हा खटला चालवण्यात येत आह़े बचाव पक्षाकडून युक्तीवाद करताना ऍड़ घाग यांनी सांगितले की, जाकादेवी बँक दरोडय़ात 6 लाख रूपये आरोपींनी चोरून नेल्याचे बँक मॅनेजर कवीश्वर यांनी तक्रारीमध्ये म्हटले आह़े बँक ही पैशाचे व्यवहार करत असल्याने बँकेकडे रकमेबाबतचा पुरावा निश्चितच उपलब्ध असला पाहिज़े मात्र नेमकी किती रक्कम चोरीला गेली, याचा कागदोपत्री पुरावा सरकार पक्षाने सादर केला नाही, असे घाग यांनी सांगितल़े तसेच जखमी सुरेश गुरव याने न्यायालयासमोर केवळ एका आरोपीला ओळखल़े मात्र त्या आरोपीने कोणते कृत्य केले, हे सांगितलेले नाह़ी तसेच घटनेच्यावेळी 3 हल्लेखोरांनी जांभळे शर्ट घातलेले होते, असे सांगितल़े तसेच त्यांच्या टिपणीत हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्य़ा झाडल्या, असे पूर्णपणे विसंगत विधान केले होत़े ओळख परेड ही संशयास्पद आह़े जखमी अवस्थेत गुरव यांच्या साक्षीप्रमाणे त्यांनी घटना बघितली, ही गोष्ट अत्यंत संशयास्पद आह़े हल्लेखोरांपैकी कोणी चेहरे झाकलेले होते, याबद्दल या साक्षीदाराने काहीही सांगितलेले नाही, असे ऍड़ घाग यांनी न्यायालयापुढे सांगितल़े
जाकादेवी सेंट्रल बँक येथे 28 नोव्हेंबर 2013 रोजी दरोडा टाकण्यात आला होत़ा यावेळी संशयित आरोपींनी बँकेतील कर्मचारी संतोष चव्हाण (ऱा धामणसे) याला गोळी घालून ठार केले होत़े तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला होत़ा तसेच संशयित आरोपी हे बँकेच्या तिजोरीतील सुमारे 6 लाख 88 हजार रुपयांची रक्कम घेऊन आरोपी खासगी वाहनाने फरारी झाले, असा आरोप संशयित 6 जणांवर ठेवण्यात आला होत़ा या आरोपींमध्ये राजेंद्र राजावत (25, रा. कल्याण), हरिष गोस्वामी (25, रा. कल्याण), प्रथमेश सावंत (18, रा. जाकादेवी), शिवाजी भिसे (25, रा. कल्याण), निखिल सावंत (24, रा. डोंबिवली) आणि प्रशांत शेलार (28, रा. मुंबई) यांचा समावेश आह़े
चौकट
जखमी गुरव यांची विसंगतीपूर्ण साक्ष
दरोडय़ाच्यावेळी सुरेश गुरव हा आरोपींची गोळी लागून जखमी झाला, असे सरकारी पक्षाचे म्हणणे आह़े मात्र गुरव ज्या ठिकाणी जखमी झाला, तेथील घटनास्थळी पंचनाम्यात रक्त आढळलेले नाह़ी गुरव याच्या म्हणण्यानुसार, 3 जांभळे शर्ट घातलेल्या हल्लेखोरांकडे 3 पिस्टल होत़ी त्याच्यावर एकापेक्षा जास्तवेळा गोळ्य़ा झाडण्यात आल्या आणि ते आरोपींना रास्त पद्धतीने ओळखू शकले नाहीत़ त्यामुळे गुरव यांची साक्ष ही पूर्णपणे विसंगतीपूर्ण आहे, असा युक्तीवाद ऍड़ संकेत घाग यांनी केल़ा