प्रतिनिधी / सातारा :
मोटार सायकल चोरटय़ाकडून 10 चोरीच्या मोटारसायकल हस्तगत करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाला यश आले आहे. आशुतोष दीपक भोसले (वय 22, रा. कुशी ता. सातारा) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक समीर कदम व कर्मचारी यांना पेट्रोलिंग करत असताना मोटार सायकल चोरणाऱ्या आरोपी आशुतोष भोसले याची माहिती मिळली. या माहितीनूसार त्याच्यावर पाळत ठेवून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे मोटार सायकल चोरीची विचारणा केली असता त्याने संभाजीनगर परिसरात राहून 1 पॅशन प्रो, 3 स्प्लेन्डर, 1 ग्रे रंगाची ऍक्टिव्हा, 1 बजाज सीटी 100, 1 डिस्कव्हर, 1 सी.डी. डिलक्स, 1 हिरो होन्डा पॅशन, 1 होन्डा शाईन मोटारसायकल चोरल्या आहेत. यापैकी 9 मोटार सायकल चोरीचे गुन्हे सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. 1 मोटार सायकल भुईंज येथून अन्य साथीदाराच्या मदतीने चोरल्याची त्याने कबुली दिली.