प्रतिनिधी / सातारा :
शाहूपुरी पोलिसांनी चोरीचा गुन्हा अवघ्या दहा दिवसांत उघडकीस आणून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून 11 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी कर्मचाऱ्यांना पेट्रोलिंग करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यावेळी एक संशयित गडकरआळी परिसरात फिरत असल्याचे लक्षात आले. पोलीसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने 11 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरल्याची कबुली दिली. हे चोरीचे साहित्य पोलीसांनी त्यांच्याकडून हस्तगत केले.