डॉक्टरच्या घरातून कोटय़वधींची चांदी लंपास
राजस्थानच्या जयपूरमध्ये घडलेल्या चोरीचा प्रकार ऐकून थक्कच व्हाल. शहरातील प्रसिद्ध हेयर ट्रान्सप्लांट (केसरोपण तज्ञ) डॉक्टर सुनीत सोनी यांच्या घराच्या तळघरात चांदीने भरलेला बॉक्स होता. पण चोरांना ही बाब कशी कळली देवालाच माहिती. याहून चकित करणारी बाब म्हणजे चोरांनी चोरीसाठी वापरलेला प्रकार आहे.
सर्वप्रथम चोरांनी डॉक्टरच्या घराला लागून असलेला एक भूखंड 90 लाख रुपयांमध्ये खरेदी केला, नंतर तेथे बांधकाम करण्याच्या बहाण्याने 3 महिन्यात 15 फूट खोल आणि 20 फूट लांबीचे भुयार तयार करत डॉक्टरच्या घराच्या तळघरापर्यंत जाऊन चोरी करण्याची व्यवस्था केली गेली.
डॉक्टर सोनी यांनी 3 महिन्यांपूर्वीच चांदीचा बॉक्स् स्वतःच्या तळघरात ठेवला होता. काही दिवसांपूर्वी तळघरात जाऊन पाहिले असता त्यांना धक्काच बसला. चोरांनी बॉक्स कटरने कापून त्यातील चांदी पळविली होती. चोरीची माहिती पोलिसांना देण्यात आली, पण बॉक्समध्ये किती चांदी होती याची माहिती डॉक्टरांनी अद्याप दिलेली नाही.
चोरांच्या टोळीत 2 किंवा 3 जणांहून अधिक लोक सामील असल्याचा संशय आहे. डॉक्टराच्या ओळखीतील लोकही यात सामील असू शकतात. तळघरात चांदीचा बॉक्स कुठे ठेवला आहे, हे चोरांना आधीपासूनच माहित होते.
सरोवराच्या पाण्यात तरंगणारी वस्ती पेरू-बोलिविया सीमेवर 70 कृत्रिम बेटांवर 4 हजार जणांचे वास्तव्य लोकसंख्या वाढू लागल्याने नव्या बेटांची निर्मिती
दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठे सरोवर टिटिकाकामध्ये पाण्यावर तरंगणाऱया वस्त्या निर्माण केल्या जात आहेत. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 12,500 फूट उंचीवर आहे. या सरोवरात 70 बेटे असून तेथे सुमारे 4 हजार लोकांचे वास्तव्य आहे. ही बेटे माणसांनीच तयार केली असून सर्व तरंगती आहेत. बेटांच्या याच वैशिष्टय़ामुळे तेथील लोकसंख्या सातत्याने वाढत आहे.
पेरू आणि बोलिवियाच्या लोकांनी सरोवरात छोटी-छोटी नवी बेटे निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. वर्ल्ड लँडफोरमच्या अहवालानुसार सरोवरात वाढणारी वस्ती आगामी काळात समस्येचे कारण ठरू शकते. कारण लोकसंख्या वाढल्याने प्रदूषण फैलावून सरोवराला नुकसान पोहोचणार आहे.
टोटोरा रीड्स
या बेटांचा पाया टोटोरा रीड्सच्या मोठय़ा आच्छादानावर रचण्यात आाल आहे. त्यावर घरही हलके लाकडू आणि टोटोरा रीड्सचे तयार करण्यात आले आहे. याचमुळे ही घरे तरंगत राहतात. टोटोरा रीड्स जलयुक्त भागांमध्ये आढळून येणारे लाकूड असते. काही मच्छिमार याच्या मदतीने नौकाही तयार करतात.