स्पप्नील वाळके खून प्रकरणातील संशयितांचा अनेक चोरी प्रकरणात हात
प्रतिनिधी/ पणजी
मडगाव येथील ज्वलर्स स्वप्नील वाळके खून प्रकरणातील संशयितांनी अनेक ठिकाणी चोऱयां करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. विविध ठिकणी चोरी केलेला सुमारे 4 लाख रुपये किमंतीचा एवज जप्त केला आहे. जप्त केलेल्या ऐवजामध्ये 8 एलसीडी टीव्ही व इतर समानाचा समावेश आहे.
स्वप्नील खून प्रकरणातील संशयित ओमकार पाटील, मुस्तफा शेख व एव्हेंडर रॉड्रीग्स हे सध्या न्यायालयीन कोठडीत असून आगशी पोलिसांनी त्यांना चोरी प्रकरणात पोलीस कोठडीत घेतले आहे. स्वप्नील वाळके यांचा खून करण्यासाठी वापरलेला चाकू हा शिरदोना येथील एका बंगल्यातून चोरी केला होता अशी कबूली संशयितांनी दिली आहे. तसेच खून प्रकराणात ज्या चार चाकी गाडीचा वापर करण्यात आला होती ती गाडी दोनापावला येथून चोरी केली होती असेही तपासात उघड झाले आहे.
खून प्रकरणात अटकेत असलेल्या तीन्ही संशयितांनी आगशी पोलीस स्थानकाच्या हद्दीत अनेक ठिकाणी चोऱया केल्या असल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून आगशी पोलीस त्या बाबत तपास करीत आहेत. आत्तापर्यंत आगशी पोलिसांनी 8 एलसीडी टीव्ही तसेच इतर साहित्या मिळून सुमारे 4 लाख रुपये किमंतीचा एवज जप्त केला आहे.
केवळ चोरी प्रकरणातच नव्हे तर संशयित एव्हेंडर रॉड्रीग्स याने अनेकांची फसवणूक करून लाखो रुपयांनी गंडा घातल्याचेही उघड झाले असून आत्तापर्यंत तीघांनी त्याबाबत आगशी पोलीस स्थानकात तक्रारी दाखल केल्या आहेत. पोर्तुगीज पासपोर्ट करून देतो असे सांगून एव्हेंडर रॉड्रीग्स याने अनेकांना लुटले असून त्याबाबतही आगशी पोलीस तपास करीत आहेत.
मडगाव येथील स्वप्नील वाळके खून प्रकरणाची तक्रार मडगाव पोलिसांनी नोंद केली होती मात्र नंतर ती तक्रार गुन्हा अन्वेषण विभागाकडे देण्यात आली. गुन्हा अन्वेष विभागाच्या पोलासंनी तीन्ही संशयितांना अटक करून पुढल तपास करीत आहेत. याबाबत सीआयडी पोलिसांनी मोठय़ाप्रमाणात पुरावे गोळा केले आहेत. वाळके खून प्रकरण हे चोरीच्या उद्देशानेच झाले असल्याचा निष्कर्श सीआडी पोलिसांनी काढला असून त्याच मार्गाने सीआयडी पोलीस तपास करीत आहेत.