चोरांच्या आवळल्या मुसक्मया, हॉस्टेलमधून चोरलेले मोबाईल जप्त
प्रतिनिधी / बेळगाव
लॅपटॉप चोरी प्रकरणाचा छडा लावण्यासाठी उद्यमबाग पोलिसांच्या पथकाने तब्बल दोन वेळा तामिळनाडूला धडक दिली आणि गुन्हेगारांच्या मुसक्मया आवळल्या. देणग्या जमविण्याचे निमित्त करून चोऱया करणाऱया टोळीतील दोन गुन्हेगारांना पकडण्यात उद्यमबाग पोलिसांना यश आले.
चोऱया, घरफोडय़ा करण्यासाठी बऱयाच वेळा टेहळणी केली जाते किंवा पाळत ठेवली जाते. पाळत ठेवणारे वेगळे व प्रत्यक्ष कृती करणारे वेगळे असतात. तामिळनाडूतील काही गुन्हेगार थेट मैदानात उतरतात. त्यांच्यासाठी पाळत ठेवण्याची गरज नाही. देणग्या जमविण्याच्या निमित्ताने ते चोऱया करतात. अशाच एका टोळीतील दोन गुन्हेगारांना उद्यमबाग पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस निरीक्षक धीरज शिंदे व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली.
उद्यमबाग परिसरात कॉलेज विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळी हॉस्टेल्स आहेत. हॉस्टेलमधून लॅपटॉप व मोबाईल चोरल्याच्या आरोपावरून तामिळनाडूतील दोघा जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याजवळून पाच मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत.
बाबू ऊर्फ उप्पू बाबू राममूर्ती (वय 26, रा. उदयराज पालैमा, पोस्ट तोट्टालमा, ता. अंबूर, जि. वेल्लूर), जावेद अत्ताउल्ला (वय 24, रा. वरदापालैमा, पोस्ट वलतूर, ता. गुडीयत्तम, जि. वेल्लूर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. त्यांच्याजवळून पाच मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत.
उद्यमबागचे पोलीस निरीक्षक धीरज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली टिळकवाडीचे पोलीस उपनिरीक्षक मणिकंठ पुजेरी, उद्यमबागचे पोलीस उपनिरीक्षक आर. पी. कदम, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व्ही. चिन्नस्वामी, जगदीश हादीमनी, इरण्णा चवलगी, आनंद बिदनूर आदींनी ही कारवाई केली. पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, उपायुक्त डॉ. विक्रम आमटे आदी वरि÷ अधिकाऱयांनी या पथकाचे कौतुक केले आहे.
बाबूजवळून चोरीचे चार मोबाईल तर जावेदजवळून एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. 26 मार्च 2021 रोजी सकाळी उद्यमबाग येथील मंदाकिनी बॉईज हॉस्टेल येथील विद्यार्थ्यांच्या खोलीतून दोन लॅपटॉप व मोबाईल पळविण्यात आले होते. चोरांची छबी सीसीटीव्हीत कैद झाली होती. सीसीटीव्हीचे फुटेज व आयएमईआय क्रमांकावरून तामिळनाडूतील गुन्हेगारांच्या मुसक्मया आवळण्यात पोलीस दलाला यश आले आहे.
देणग्या मागण्याच्या बहाण्याने चोऱया
बाबू राममूर्ती हा चोरीसाठी गावोगावी फिरत असतो. मार्च 2021 मध्ये बेंगळूरहून तो बेळगावला आला होता. कणबर्गी परिसरातील एका शाळेत त्याचे वास्तव्य होते. दिवसभर देणग्या गोळा करण्याच्या निमित्ताने तो घरोघरी फिरायचा. ‘आम्ही धर्मादाय संस्था चालवतो, आम्हाला देणगी द्या’ अशी मागणी करत तो घरात शिरायचा. घरातील मंडळी जरा बाजूला झाली की हाताला मिळेल ते चोरण्यात त्याचा हातखंडा आहे. उद्यमबाग येथील हॉस्टेलमधून त्याने चोरी केली होती. त्याची छबी सीसीटीव्हीत कैद झाली होती. चोरीचे मोबाईल त्याने मोबाईल दुकानदार जावेद अत्ताउल्ला याला विकले होते. जावेदकडून मोबाईल खरेदी करणाऱया इलया राजा नामक तरुणामुळे पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले. बाबू व जावेद ज्या वड्डरवाडी परिसरात राहतात, तेथे अशाच लोकांची वस्ती आहे. स्थानिक पोलीसही तेथे शिरण्याचे धाडस करत नाहीत. बेळगाव पोलिसांनी लॅपटॉप चोरीचा छडा लावण्यासाठी तामिळनाडूतील दोघा जणांच्या मुसक्मया आवळल्या आहेत. चोरीच्या लॅपटॉपचाही शोध घेण्यात येत आहे.