उपनगरातील बंद घरे चोरट्यांचे लक्ष्य
बेळगाव शहर व उपनगरात चोर्या, घरफोडय़ांच्या घटना वाढल्या आहेत. रविवारी मध्यरात्री 5 हून अधिक चोर्यांच्या घटना घडल्या आहेत. चोरट्यांनी उपनगरातील बंद घरे लक्ष्य बनविली आहेत. जयनगर-हिंडलगा, गोकुळनगर, विजयनगर व शहापूर परिसरात या घटना घडल्या असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.