टिळकवाडी येथील घटना, तरुणाला अटक
प्रतिनिधी/ बेळगाव
चौकशीसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला करण्यात आला आहे. रविवारी सकाळी मंगळवार पेठ, टिळकवाडी येथे ही घटना घडली असून पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. यासंबंधी टिळकवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
आकाश अनिल भवानी (वय 23) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. टिळकवाडीचे पोलीस उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर यांनी तिघा जणांवर एफआयआर दाखल करून घेतले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 6 ऑगस्ट रोजी अनिल भवानी यांच्यावर एक एफआयआर दाखल झाला होता. पिठाची गिरणी चालविणाऱया महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून एफआयआर दाखल करून रविवारी सकाळी या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीस त्यांच्या घरी पोहोचले.
पोलीस पथकाला चाकू व विळय़ाने हल्ल्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी पोलिसांनी आकाशला ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात आणले. या झटापटीत आकाशचा भाऊ अक्षय अनिल भवानी (वय 20) हा जखमी झाला असून त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत.
अक्षयने दिलेल्या माहितीनुसार एका जागेच्या वादातून पोलिसांनी आमची तक्रार स्वीकारली नाही. रविवारी सकाळी 7 ते 8 जण साध्या वेशात आमच्या घरी आले. ते पोलीस आहेत हेही आम्हाला माहीत नव्हते. या घटनेत आपणही जखमी झालो आहे, असे त्या तरुणाने सांगितले.